सध्या लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. देशभरात भाजपासह इतर
पक्ष देखील मोठ्या प्रमाणात प्रचार सभा घेत आहेत. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित
शहा यांनी पश्चिम बंगालमधील एका प्रचार सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी
पाकव्याप्त काश्मीरवर महत्वपूर्ण विधान केले आहे. जगातील कोणतीही ताकद भारताला
पीओके घेण्यापासून रोखू शकत नाही असे शहा म्हणाले आहेत. त्यांनी या मुद्द्यावरून
राहुल गांधींवर देखील टीका केली आहे.
पश्चिम बंगाल येथील सभेला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित
शहा म्हणाले, ”ते आम्हाला सांगत आहेत की पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यामुळे
पीओकेला भारताचा भाग बनवणे धोकादायक आहे. मला राहुलबाबांना सांगायचे आहे की,
आम्ही
अणुबॉम्बला घाबरत नाही. पीओकेला भारताचा भाग बनवण्यापासून रोखू शकणारी कोणतीही
शक्ती अतित्वात नाही.”
पुढे बोलताना शहा म्हणाले, ”भाजपच्या
नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) लोकसभा
निवडणुकीच्या पहिल्या पाच टप्प्यातच ३१० चा टप्पा ओलांडला आहे. केंद्रीय गृहमंत्री
पश्चिम बंगालच्या कांठी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रॅलीत म्हणाले की, तुम्हाला
जाणून घ्यायचे आहे की एनडीएची आतापर्यंतची स्थिती काय आहे? मी तुम्हाला
सांगू शकतो की पहिल्या पाच टप्प्यांनंतर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएने
आधीच ३१० चा आकडा पार केला आहे. पराभवाच्या भीतीने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री
ममता बॅनर्जी निराश झाल्या आहेत. त्या आता पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर करत
आहे.