Mallikarjun Kharge : नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत भाजपच्या 400 पारच्या घोषणेला विरोध करताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जे काही बोलत आहेत ते खोटे आहे. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत त्यांनी अपेक्षित संख्याबळ गाठले, मात्र यावेळी त्यांना सत्तेत येणे अवघड आहे. दक्षिणेत आणि उत्तरेतही ते पराभूत होत आहेत.
मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, यापूर्वी आमच्याकडे फक्त दोन जागा होत्या, मात्र यावेळी आम्ही आमची संख्या 10 पर्यंत वाढवणार आहोत. कर्नाटकात आमची एक जागा होती, पण यावेळी आम्ही ती वाढवून 10 करणार आहोत. जिथे आम्ही हरलो तिथे आम्ही जिंकत आहोत, जिथे भाजपला एक किंवा शून्य जागा मिळाल्या तिथे ते जागा वाढवत नाहीत. महाराष्ट्रात आम्हाला जागा मिळत आहेत.
तुम्ही राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, पंजाब, हरियाणा येथे गेलात तरी या राज्यांमध्ये आम्ही चांगले काम करत आहोत. यूपीमध्ये आम्हाला 10 जागा मिळतील आणि आमच्या इंडिया आघाडीला 14 जागा मिळतील, असा दावा मल्लिकार्जुन खरगेंनी केला आहे.
पुढे काँग्रेसच्या कामगिरीबाबत ते म्हणाले, आमचा जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न आहे. लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी 273 जागांची गरज आहे, त्यापेक्षा जास्त जागा आम्हाला यावेळी मिळतील. आमची आघाडी 300 हून अधिक जागा जिंकेल. संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आम्ही युती म्हणून एकत्र आलो आहोत आणि आम्ही जिंकू, असा विश्वासही खरगेंनी व्यक्त केला.