वैशाख महिन्याच्या कृष्ण द्वितीय ला नारदांचा जन्म झाला म्हणून तो दिवस नारद जयंती म्हणून साजरा केला जातो हिंदू धर्मग्रंथा नुसार नारद मुनी हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणून मानले जातात नारद मुनींच्या अनेक पौराणिक कथा आपण ऐकल्या आहेत. नारद मुनी हे विष्णूचे परमभक्त होते. सतत नारायण नारायण असा त्यांचा जप चालत असे. त्यांना ब्रह्मांडात कुठेही फिरण्याची कुठेही पोहोचण्याची क्षमता होती.
स्वर्गलोक मृत्यूलोक पातळलोक ह्या सर्व ठिकाणी त्यांचा सतत मुक्त संचार असे. त्यामुळे नारद मुनींना *पहिला पत्रकार* किंवा *पहिला संचार प्रतिनिधी* असं सुद्धा समजलं जातं भगवान विष्णूंना संबोधून अनेक भक्ती गीत ते गातात हे गात असताना वीणा आणि चिपळ्यांची साथ ही त्याला असे बुद्धिमान नारद म्हणजे देव देवतांच्या माहितीचा एक स्त्रोत होते. त्यांनीच वाल्मिकी ऋषींना राम कथा ऐकवली होती.
धर्मप्रचार आणि लोककल्याणासाठी ते नेहमी प्रयत्नशील होते म्हणूनच की काय नारदीय कीर्तन ही पण संकल्पना पुढे आली. कारण किर्तन हे माध्यम धर्मप्रसार समाज प्रबोधन यासाठी वापरलं जाणार मुख्य माध्यम आहे. त्यामुळे कीर्तन हा जेव्हा शब्द आपण वापरतो तेव्हा आपोआपच नारद मुनींची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते.
पुष्पा गोटखिंडीकर, नाशिक
सौजन्य -समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र