समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आझम खान यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. आझम खान यांचा मुलगा अब्दुल्ला आझम याच्या दोन बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणात हायकोर्टाने त्यांना दिलासा दिला आहे. सध्या उच्च न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध सुनावलेल्या सात वर्षांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. आझम यांच्यासह त्याची पत्नी आणि मुलालाही उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली नाही.
जामीन मिळाल्यानंतर आझम खान यांचे कुटुंबीय तुरुंगातून बाहेर येऊ शकतात. आझम खान, अब्दुल्ला आझम आणि तंजीन फातमा यांना रामपूरच्या विशेष न्यायालयाने बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणात प्रत्येकी सात वर्षांची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला आझम खान, पत्नी आणि मुलाने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
18 ऑक्टोबर 2023 रोजी रामपूरच्या विशेष न्यायालयाने तिघांनाही सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यांच्याकडून 50-50 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय कुमार सिंह यांच्या एकल खंडपीठाने हा निकाल दिला आहे. तिन्ही याचिकांवर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने १४ मे रोजी निर्णय राखून ठेवला होता.