लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. ५ टप्प्यांमध्ये
महाराष्ट्रातील ४८ जागांवर मतदान पूर्ण झाले आहे. महाराष्ट्रात आता लोकसभा
निवडणुकीनंतर विधानपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल ४
जून रोजी लागणार आहे. त्यानंतर विधानपरिषदेच्या निवडणूका होणार आहेत.
विधानपरिषदेच्या ४ जागांसाठी निवडणूक होणार आहे. मुंबई, कोकण, नाशिक या मतदार संघात निवडणूक होणार आहे.
याआधी १० जून रोजी विधानपरिषदेच्या
निवडणुका होणार होत्या. मात्र त्या निवडणुकीच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. आता
विधानपरिषदेच्या निवडणूक या २६ जून रोजी होणार आहेत. राज्यात लोकसभा निवडणुकीच्या
पार्श्वभूमीवर विधानपरिषद निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता या
निवडणुकांसाठी नव्याने कायर्क्रम जाहीर करण्यात आला आहे. २६ जून रोजी निवडणूक
होणार असून, १
जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.