लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. ५ व्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. आज ६ व्या टप्प्यातील मतदान सुरु झाले आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरु झाले आहे. आज तब्बल ११.३ कोटींपेक्षा जास्त नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर एकूण ८८९ उमेदवारांचे भवितव्य EVM मध्ये बंद होणार आहे. आज ६ व्या टप्प्यात एकूण ५८ जागांवर मतदान सुरु झाले आहे. दरम्यान भारताच्या प्रथम नागरिक आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील राजधानी दिल्लीत मतदानाचा हक्क बजावला आहे.
दरम्यान आजच्या ६ व्या टप्प्यात उत्तर प्रदेशमधील १४,हरियामध्ये १०, बिहारमध्ये ८, पश्चिम बंगालमध्ये ८, दिल्लीमध्ये ७ तर ओडिशामध्ये ६ जागांवर मतदान होत आहे. तसेच झरखंडमधील ४ आणि जम्मू काश्मीरमधील १ जागेवर आज मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानाच्या सहावा टप्पा पूर्ण झाल्यानंतर देशातील लोकसभेच्या ४८४ जागांवर मतदान पार पूर्ण होणार आहे. यानंतर १ जून रोजी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात केवळ ५७ जागांवर निवडणूक होणार आहे. ४ जून रोजी सर्व टप्प्यातील मतमोजणी एकाच वेळी होणार असून त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहेत. एकूण ८८९ उमेदवारांचे भवितव्य EVM मध्ये बंद होणार आहे. आज ६ व्या टप्प्यात एकूण ५८ जागांवर मतदान सुरु झाले आहे.