निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात आज सकाळी 11 वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये 36.88 टक्के इतके मतदान झाले आहे जे सर्वात जास्त आहे.
त्याखालोखाल झारखंडमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 27.80 टक्के जास्त मतदान झाले,तर सहाव्या टप्प्यात मतदान सुरू असलेली इतर राज्ये म्हणजे- बिहार–23.67 टक्के, हरियाणा- 22.09 टक्के, जम्मू-काश्मीर–23.11 टक्के, दिल्लीचा राष्ट्रीय राजधानी प्रदेश–21.69 टक्के, ओडिशा– 21.30 टक्के आणि उत्तर प्रदेश 27.06 टक्के.अशी मतदानाची टक्केवारी आहे.
सकाळी 11 वाजता देशभरात अंदाजे 25.76 टक्के मतदान झाले.
सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी कडेकोट सुरक्षा आणि बंदोबस्तात सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेल्या 58 लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात बिहारमधील आठ, हरियाणातील सर्व 10 जागा, जम्मू-काश्मीरमधील एक, झारखंडमधील चार, दिल्लीतील सर्व सात, ओडिशातील सहा, उत्तर प्रदेशातील 14 आणि पश्चिम बंगालमधील आठ जागांचा समावेश आहे. . एकूण 889 उमेदवार रिंगणात आहेत.
ओडिशातील बेचाळीस विधानसभा मतदारसंघांसाठी सहाव्या टप्प्यातही मतदान सुरू आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा निवडणुका होत आहेत.
सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या पाच टप्प्यांमध्ये 25 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी 428 लोकसभा मतदारसंघांवर मतदान आधीच पूर्ण झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात 5.84 कोटी पुरुष, 5.29 कोटी महिला आणि 5120 तृतीय लिंग मतदारांसह 11.13 कोटी पेक्षा जास्त मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यास पात्र आहेत. निवडणुकीच्या या टप्प्यात सुमारे 11.4 लाख मतदान अधिकारी सहभागी होणार आहेत.
सातव्या टप्प्यातील मतदानानंतर 1 जून रोजी लोकसभा निवडणूक पूर्ण होईल ज्यामध्ये 57 मतदारसंघातील मतदार मतदानाचा हक्क बजावतील. 4 जून रोजी निकाल जाहीर होतील.