आयुर्वेदिक क्रीमचे उत्पादन घेणाऱ्या विको कंपनीचे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे. वयाच्या 85 व्या वर्षी नागपूर येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी शुभदा, मुले अजय व दीप, मुलगी दीप्ती, नातवंडे व मोठा आप्तपरिवार आहे
विको कंपनी ही आयुर्वेदिक सौंदर्य प्रसाधनासाठी नावाजलेली कंपनी आहे. तसेच विको कंपनीची जाहिरात आजही लोकांच्या लक्षात आहे. त्यांची आयुर्वेदिक जडी बुटी असलेली टूथ पेस्ट आजही घराघरात प्रसिद्ध आहे.
विको कंपनीचे पूर्ण नाव विष्णू इंडस्ट्रियल केमिकल कंपनी आहे. विको कंपनीची सुरुवात १९५२ मध्ये एका छोट्या घरात झाली. केशव विष्णू पेंढारकर यांनी ही कंपनी सुरू केली. यशवंत पेंढारकर हे २०१६ मध्ये विको कंपनीचे चेअरमन झाले होते.
एक सौम्य, शालीन व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची औद्याोगिक विश्वात ओळखले जाणारे यशवंत पेंढरकर यांनी कायद्याची पदवी (एलएलबी) घेतली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते विको समुहात रूजू झाले होते. त्यांच्या कायदेविषयक अभ्यासाचा विको समुहाला फायदा झाला.ते २०१६ मध्ये विको कंपनीचे चेअरमन झाले. त्यांच्या नेतृत्वात कंपनीने काळानुरूप बदल करीत प्रगतीचे नवनवीन टप्पे गाठले होते. .यशवंत पेंढारकर यांच्याच कारकीर्दीतच कंपनीला ‘ब्रॅण्ड ऑफ द इअर २०२३’ या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासह निर्यातीशी संबंधित बरेच पुरस्कार त्यांच्या कार्यकाळात कंपनीला मिळाले आहेत.