पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पाटणा येथील बिक्रम येथे भाजप उमेदवार रामकृपाल यादव यांच्या बाजूने जाहीर सभेला संबोधित करताना बिहारच्या इतिहासावर जोर देत सांगितले की बिहारने एससी, एसटी, ओबीसी आरक्षणासाठी दीर्घकाळ लढा दिला आहे. आपली राज्यघटना सांगते की भारतात धर्माच्या आधारावर आरक्षण दिले जाणार नाही. बाबासाहेब आंबेडकरही हेच म्हणायचे.
इंडिया आघाडीवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, “आरजेडी आणि काँग्रेसच्या लोकांना मुस्लिमांना आरक्षण द्यायचे आहे. 2024 च्या निवडणुकीत जेव्हा मी या पक्षांचे षड्यंत्र उघडकीस आणले तश्या त्यांच्या एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षणविरोधी कारवाया समोर येत आहेत, पण मी ‘मोदींची हमी’ देतो की, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत सर्वात मागास, ओबीसी, एससी आणि एसटीचे हक्क हिरावून घेतले जाणार नाहीत”.
मोदी म्हणाले की, “माझ्यासाठी संविधान सर्वोच्च आहे. मी एससी-एसटी आणि ओबीसी आरक्षणाच्या पाठीशी उभा आहे आणि यापुढेही राहीन. मी जिवंत असेपर्यंत लढत राहीन “.
सभेत उत्साही लोकांना उद्देशून ते म्हणाले की, “४ जूनसाठी मणेरचे लाडू तयार ठेवा. निवडणूक निकालांचे एक्झिट पोलिंग सुरू झाले आहे. जर इंडिया आघाडीचे लोक शिवीगाळ करताना दिसले तर याचा अर्थ स्पष्ट आहे की NDA च्या यशाचा एक्झिट पोल आला आहे. 4 जून रोजी नवा विक्रम होणार आहे”.
आरजेडीवर हल्लाबोल करताना मोदी म्हणाले की,” ते बिहारमध्ये कंदील घेऊन फिरत आहेत. याच कंदिलाने बिहारमध्ये अंधार पसरवला आहे. हा कंदील एकच घर उजळतो.मग आजूबाजूला अंधार असेल तर असो. तीस वर्षांत एका घरात उजेड आणि सर्वत्र अंधार. दुसऱ्याच्या मुला-मुलींबद्दल तर विचारच करता नाहीत”.
ही निवडणूक खासदार निवडण्यासाठी नसून देशाचा पंतप्रधान निवडण्यासाठी असल्याचे मोदी म्हणाले आहेत. “भारताला अशा पंतप्रधानाची गरज आहे जो या शक्तिशाली देशाची ताकद जगासमोर मांडू शकेल. भाजपचे उमेदवार रामकृपाल यादव यांच्या बाजूने मतदान करून मोदींना त्यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले”.