राज्यात वातावरण सतत बदलताना पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस तर अनेक ठिकाणी उष्णतेची लाट निर्माण झालेली पाहायला मिळत आहे. देशातील अनेक र्जायत तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत उष्णतेचा पारा वाढतच आहे. सध्या विदर्भात उन्हाचा तडाखा बसत आहे. पुढील आठवड्यात देखील उत्तर भारतासह अनेक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक तापमान असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात कलम १४४ लागू केले आहे. नक्की हा निर्णय काय आहे ते जाणून घेऊयात.
खान्देशातील जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक तापमान असल्याचे समोर आले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे कोणाला त्रास होऊ नये, तसेच उन्हामध्ये कोणत्या कामगाराला काम करण्याची वेळ येऊ नये , तसेच कोणत्या संस्थेने कामगारांना उन्हात काम करण्यासाठी बाध्य करू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने कलम १४४ लागू करण्यात आला आहे. तसेच कलम १४४ चा अर्थ नागरिकांनी लॉकडाऊन किंवा जमावबंदी असाघेऊ नये असे जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी सांगितले आहे.