लोकसभा निवडणुकीचे आज ६ टप्पे पूर्ण झाले आहे. आज ८ राज्यांमध्ये ५८
जागांसाठी मतदान पार पडले. अनेक उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएम मशीनमध्ये बंद
झाले आहे. आजच्या ६ व्या टप्प्यात उत्तर प्रदेशमधील १४,हरियामध्ये १०, बिहारमध्ये ८, पश्चिम बंगालमध्ये ८, दिल्लीमध्ये ७ तर ओडिशामध्ये ६ जागांवर
मतदान झाले आहे. तसेच झरखंडमधील ४ आणि जम्मू काश्मीरमधील १ जागेवर आज मतदान पूर्ण
झाले आहे. मतदानाच्या सहावा टप्पा पूर्ण झाल्यानंतर देशातील लोकसभेच्या ४८४
जागांवर मतदान पार पूर्ण झाले आहे. यानंतर १
जून रोजी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात केवळ ५७ जागांवर निवडणूक होणार
आहे. ४ जून रोजी सर्व टप्प्यातील मतमोजणी एकाच वेळी होणार असून त्याच दिवशी
निकालही जाहीर होणार आहेत. दरम्यान ६ व्या टप्प्यात संध्याकाळी ६वाजेपर्यंत 58.82 % मतदान झाले आहे.
राज्यनिहाय मतदानाची टक्केवारी
बिहार- 52.80%
हरियाणा- 58.05%
जम्मू-कश्मीर- 51.41%
झारखंड- 61.13%
दिल्ली- 54.31%
ओडिशा- 59.72%
उत्तर प्रदेश- 54.02%
पश्चिम बंगाल- 78.19%