Hardik Pandya – Natasha Stankovic Divorce : भारताचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सध्या जोरदार सुरू आहेत. या बातमीने चांगलीच खळबळ उडाली आहे. हार्दिक आणि नताशा खरंच वेगळे होणार का? अशी चर्चा सध्या सुरू आहे. अशातच आता या बातम्यांदरम्यान नताशाची पहिली प्रतिक्रिया आली आहे. तिच्या या प्रतिक्रियेच्या व्हिडिओने सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वी नताशाने तिच्या इंस्टाग्रामवर प्रोफाईलवरील पांड्या हे आडनाव हटवले आहे. याच कारणामुळे दोघे वेगळे होत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. तसेच आयपीएल 2024 मध्येही नताशा हार्दीक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्ससाठी चीअर करण्यासाठी स्टेडियममध्ये दिसली नाही, त्यामुळे चर्चांना आणखी उधाण आले आहे.
अशातच ता नताशाचा एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती एका तरूणासोबत फिरताना दिसली. पापाराझींनी नताशाला पाहिले आणि फोटो काढत असताना नताशाला कोणीतरी हार्दिकसोबतच्या घटस्फोटाच्या बातमीबद्दल विचारले तेव्हा नताशा फक्त दोन शब्द बोलून निघून गेली. यावेळी नताशा म्हणाली, “धन्यवाद.” Instabollywood नावाच्या इंस्टा हँडलने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामुळे आता नताशाची ही प्रतिक्रिया ऐकून आणि नताशा दुसऱ्यासोबत फिरताना पाहून घटस्फोटाच्या चर्चांना आणखी उधाण आले आहे.
https://www.instagram.com/reel/C7ZKm2wyFTL/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, 2020 मध्ये हार्दीक पांड्याने नताशाला प्रपोज केले होते. तेव्हापासून दोघेही एकत्र होते. यानंतर दोघांनी गेल्या वर्षी दोनदा लग्न केले. पहिला विवाह हिंदू रितीरिवाजांनुसार तर दुसरा ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार झाला होता. तर या दोघांनाही आगसत्य नावाचा एक मुलगा आहे.