CM Yogi Adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा विरोधी इंडिया आघाडीवर निशाणा साधला. सीएम योगी म्हणाले की, समाजवादी पक्ष आणि काँग्रेस तुष्टीकरणाचे राजकारण करतात, अशी टीका मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.
उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे एका प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, जेव्हा रामलल्ला अयोध्येत विराजमान झाले, तेव्हा अनेक बड्या माफियांचे राम नाम सत्य झाले आहे. तसेच सपा सरकारच्या काळात राज्यातील मुली आणि व्यापारी सुरक्षित नाहीत आणि गाझीपूर हे त्याचे जिवंत उदाहरण आहे, असे मुख्यमंत्री योगी म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, पश्चिम बंगालमधील काँग्रेसचा सहयोगी पक्ष रामकृष्ण मिशनच्या संतांना धमकावत आहे. जणू तिथे ‘रावणराज्य’ सुरू आहे, त्यांना वैयक्तिक कायदे लादून आमच्या मुलींकडून त्यांचे हक्क हिरावून घ्यायचे आहेत. सपा, काँग्रेस महिलांना घराबाहेर पडण्यापासून रोखू इच्छित आहेत आणि त्यांना बुरखा घालण्यास भाग पाडू इच्छित आहे, अशी टीकाही योगींनी केली.