Sharad Pawar : नुकताच शरद पवार यांनी खळबळजन खुलासा केला आहे. भाजपसोबत जावं असं आमच्या बऱ्याच आमदारांचं म्हणणं होतं, असा खुलासा शरद पवारांनी केला आहे. तसंच आमदारांच्या या निर्णयावर शरद पवारांची भूमिका काय होती? हे देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.
शरद पवारांनी 2004, 2014, 2017, 2019 यावेळी भाजपसोबत सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी चर्चा केली होती, असा दावा राष्ट्रवादीचे नेते करतात. यावर शऱद पवारांनी स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, आपण भाजपसोबत जावं असं आमच्या पक्षातील अनेक सहकाऱ्यांचं मत होतं. काही सहकाऱ्यांचं म्हणणं होतं की आपण भाजपसोबत सत्ते जावं तर काही सहकाऱ्यांचं म्हणणं होतं की आपण भाजप पक्षामध्ये जावं.
प्रफुल्ल पटेल यांचा 2004 मध्ये आग्रह होता की आपण भाजपसोबत जावं. पण ते मी स्वीकार केलं नाही कारण प्रफुल्ल पटेल आणि माझ्या विचारांमध्ये अंतर होतं. तसेच प्रफु्ल्ल पटेल यांनी माझ्या विचारांचा आदर ठेवला आणि सुदैवानं आमचं सरकार सत्तेत आलं, असं शरद पवार म्हणाले.
पुढे ते म्हणाले, आता जे आमदार निवडून आले त्यातील काही आमदारांचं म्हणणं होतं की आपण भाजपबरोबर जावं. त्यावर मी त्यांना म्हटलं की तुमचा जो काय प्रस्ताव असेल तो चर्चा करून सांगा. त्यांचा जो प्रस्ताव होता तो मला पटणारा नव्हता. म्हणून मी त्यांना म्हटलं ज्यांना जायचं आहे त्यांना स्वातंत्र्य आहे, पण मी येणार नाही. त्यानंतर काही काळाने काही लोकांनी तो निर्णय घेतला, असंही शरद पवार म्हणाले.