Swati Maliwal : दिल्लीच्या माजी महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीचे प्रकरण आता देशभरात जोर धरत आहे. तर या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. आज सकाळीच स्वाती मालीवाल यांनी या प्रकरणाबाबत अनेक मोठे खुलासे केले आहेत. मालीवाल यांनी ‘X’ वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी सांगितले की, यूट्यूबर ध्रुव राठीच्या व्हिडिओनंतर त्यांना बलात्कार आणि खुनाच्या धमक्या येत आहेत.
एक्सवर पोस्ट शेअर करत स्वाती मालीवाल म्हणाल्या की, ‘आप’ पक्ष त्यांच्याविरोधात नियोजनबद्ध पद्धतीने मोहीम चालवत आहे. या पोस्टसोबत त्यांनी अनेक स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत, ज्यामध्ये त्यांना बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यूट्यूबर ध्रुव राठीबद्दल बोलताना मालीवाल यांनी लिहिले की, ते त्यांच्या चॅनलवर कथेची फक्त एक बाजू दाखवत आहेत, जे पूर्णपणे चुकीचे आहे.
पुढे मालीवाल यांनी सांगितले की, मी ध्रुव राठीला माझी बाजू समजावून सांगण्यासाठी अनेक कॉल आणि मेसेज करत होते पण राठीने माझा एकही कॉल उचलला नाही किंवा मेसेज पाहिले नाहीत. हे खूप लज्जास्पद आहे की ध्रुव राठी ‘आप’च्या प्रवक्त्यासारखे वागतो आहे.
https://x.com/SwatiJaiHind/status/1794629339293552650
तसेच स्वाती मालीवाल यांनी एक्स हँडलवर बलात्कार आणि खुनाच्या धमक्यांचे स्क्रीनशॉटही पोस्ट केले आहेत. तर हे प्रकरण दिल्ली पोलिसांकडे नेत असून मला काही झाले तर ज्याने सुरुवात केली त्याला जबाबदार धरले जाईल असे स्वाती मालीवाल यांनी म्हटले आहे.