कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल २०२४ चा चॅम्पियन संघ ठरला आहे. सनरायझर्स हैदराबादचा ८ विकेट्सने पराभव करत मोठा विजय नोंदवला आहे. . चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात हैदराबादने केकेआरला विजयासाठी अवघ्या ११४ धावांचे सोपे आव्हान दिले होते. जे कोलकाता संघाने अवघ्या षटकांत सहज गाठले.कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि संघ तसेच मेंटॉर गौतम गंभीरने (Gautam Gambhir) केकेआरच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.केकेआरने सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव करत तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे. .
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाचे तिसरे इंडियन प्रीमियर लीग विजेतेपद जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे.तसेच त्यांनी कर्णधार श्रेयस अय्यर यांचे विजयी हंगामासाठी अभिनंदन केले. मोठ्या संख्येने येऊन 17 वी आवृत्ती यशस्वी केल्याबद्दल त्यांनी चाहत्यांचे आभारही मानले.
जय शाह यांनी ट्विटमध्ये असे म्हणाले आहेत की, “रविवारी रात्री चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात हैदराबादविरुद्धच्या शानदार अष्टपैलू कामगिरीसह KKR ने IPL 2024 चे विजेतेपद जिंकले.त्यांच्या तिसऱ्या विजेतेपदासाठीचे सेलिब्रेशन चेपॉक येथे सुरू झाले, त्याच मैदानावर त्यांनी 2012 मध्ये गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली पहिले विजेतेपद जिंकले होते”.
या सामन्यात केकेआरच्या गोलंदाजांनी सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांना केवळ 113 धावांवर रोखून आश्चर्यचकित केले आणि त्यानंतर फलंदाजांनी केवळ 10.3 षटकांत आठ विकेट्स शिल्लक असताना लक्ष्य गाठले आहे.