Maharashtra Board 10th Result 2024 Declared : गेल्या काही दिवसांपासून दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना निकालाची प्रतिक्षा होती. अखेर आता ही प्रतिक्षा आणि धाकधूक संपली आहे. आज (27 मे) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची एकूण टक्केवारी जाहीर केली आहे. यंदा दहावीचा निकाल 95.81 टक्के लागला आहे.
यावर्षीही दहावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. तर कोकण विभाग अव्वय ठरला आहे. राज्यामध्ये कोकण विभागातील 99.01 टक्के विद्यार्थी उर्तीण झाले आहेत. तर सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा लागला आहे. 94.73 टक्के एवढा नागपूर विभागाचा निकाल लागला आहे.
यंदा मुलींचा निकाल हा 97.21 टक्के लागला आहे तर मुलांचा निकाल 94.56 टक्के लागला आहे. मुलींच्या निकाल हा मुलांपेक्षा 2.65 टक्क्यांनी अधिक आहे. तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातरर्फे दहावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे.