Remal Cyclone : बांगलादेशच्या किनारपट्टीवर ‘रेमल’ हे चक्रीवादळ पोहोचले आहे. या भीषण चक्रीवादळामुळे आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर तेथील लाखो लोकांच्या घरात वीज नाहीये. तसेच वादळ आणि ताशी 120 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे शेकडो गावे पाण्याखाली गेली आहेत.
रविवारी मध्यरात्री भूस्खलनानंतर ताशी 80-90 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. तर आज’रेमाल’चे चक्रीवादळात रूपांतर झाल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 5.30 वाजता सागर बेटाच्या ईशान्येकडे हवामान प्रणाली 150 किमी अंतरावर होती. त्यामुळे मुसळधार पाऊस आला तर आता तो ईशान्येकडे सरकला आहे.
या चक्रीवादळासह जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस होता. त्यामुळे बरिसाल, भोला, पटुआखली, सातखीरा आणि चट्टोग्रामसह अनेक भाग प्रभावित झाले आहेत. तर पटुआखली येथे वादळात दोन महिलांसह एक व्यक्ती वाहून गेले. तसेच सातखीरा येथे वादळातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात पडून आणखी एकाचा मृत्यू झाला. बारिशाल, भोला आणि चट्टोग्राममध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर मोंढा येथे ट्रॉलर बुडाल्याने एका लहान मुलासह दोन जण बेपत्ता आहेत.
या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशने आग्नेय शहर चट्टोग्राममधील विमानतळ बंद केले आहे. तर बांगलादेशने चितगावमधील देशातील सर्वात मोठ्या मुख्य बंदरावर लोडिंग आणि अनलोडिंग देखील निलंबित केले आहे. याशिवाय अधिक जहाजे घाटातून खोल समुद्रात हलवण्यात आली आहे. सोबतच सरकारने पुढील सूचना मिळेपर्यंत परिसरातील सर्व शाळा बंद केल्या आहेत.
‘रेमल’ मुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी ग्रामीण विद्युत प्राधिकरणाने किनारपट्टी भागातील 15 दशलक्ष लोकांची वीज कापली आहे. काही भागात 12 तासांहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित झाला आहे. मात्र, वादळ शमल्यानंतर वीज जोडणी पूर्ववत करण्याची तयारी वीज कर्मचारी करत आहेत.