Amitabh Bachchan : रविवारी (26 मे) झालेल्या आयपीएल 2024 सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा दारूण पराभव केला. तसेच केकेआरने आयपीएल 2024 च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. या विजयानंतर केकेआरने जोरदार सेलीब्रेशन केले, मात्र, पराभूत संघाचे चाहते निराश झाले होते.
सनरायझर्स हैदराबादच्या पराभवामुळे चाहत्यांसह बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चनही निराश झाले आहेत. सामन्यानंतर बिग बींनी त्यांच्या ब्लॉगवर सामन्याबद्दलचे मत व्यक्त केले. यावेळी सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन यांचा उल्लेख करत अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, काव्याला तिचे अश्रू लपवताना पाहणे हा खूप दुःखाचा क्षण होता. तसेच आता आयपीएल संपले आहे. केकेआर जिंकला आणि एसआरएच हरला. मात्र, केकेआर प्रमाणेच एसआरएच हा एक चांगला संघ आहे, जो अनेक सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करताना दिसला आहे.
पुढे बिग बींनी त्यांच्यासाठी सर्वात हृदयस्पर्शी असलेल्या क्षणाबद्दलही सांगितले. खेद व्यक्त करताना त्याने लिहिले की, पराभवानंतर हैदराबाद संघाची मालक काव्या मारन भावूक होऊन होऊन रडू लागली. तिने कॅमेऱ्यांपासून तोंड फिरवले. यावर बच्चन यांना काव्यासाठी वाईट वाटले आहे. सहानुभूती व्यक्त करताना त्यांनी लिहिले, “माय डीअर! हरकत नाही, उद्या आणखी एख दिवस आहे.” तसेच सध्या काव्या मारन यांचा भावूक झालेला व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
https://x.com/mufaddal_vohra/status/1794780457827291252
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघाला 18.3 षटकात केवळ 113 धावा करता आल्या. त्याचवेळी, कोलकाता संघाने 10.3 षटकांत दोन गडी गमावून लक्ष्य गाठले. केकेआरचे हे तिसरे आयपीएल विजेतेपद आहे. यापूर्वी 2012 आणि 2014 मध्येही केकेआरने ट्रॉफी जिंकली होती.