पंढरपूर हे महाराष्ट्रासह देशातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. आषाढी कार्तिकी दिवशी लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येत असतात. मात्र गेले अनेक दिवस विठुरायाच्या चरणांचे दर्शन भाविकांना घेता येत नव्हते. दरम्यान तब्बल ७९ दिवसानंतर विठुरायाचे चरण दर्शन सुरु होणार आहे. २ जूनपासून विठलाच्या चरणाचे दर्शन भाविकांना मिळणार आहे. मंदिर संवर्धन या कारणामुळे १५ मार्चपासून देवाचे चरणांचे दर्शन बंद करण्यात आले होते.
विठुरायाचे चरण दर्शन १५ मार्च पासून बंद करण्यात आले होते. मंदिर संवर्धनच्या कारणामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे भाविकांना पहाटे ६ ते सकाळी ११ या वेळेतच मुखदर्शन करण्याची परवानगी देण्यात आली होती. २ जून रोजी विठूरायाची पूजा होणार आहे. या पूजेला पालकमंत्री उपस्थित राहणार आहे. मात्र आचारसंहिता असल्याने पूजा मुख्य पुजाऱ्यांच्या हस्तेच केली जाणार आहे. आता पुन्हा एकदा विठूरायाचे चरण दर्शन घेता येणार असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.