Prajwal Revanna : कर्नाटकातील सेक्स स्कँडल प्रकरण उघडकीस आल्यापासून मुख्य आरोपी प्रज्वल रेवण्णा फरार आहे. या प्रकरणात प्रज्वल रेवण्णावर अनेक गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. तर हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर प्रज्वल रेवण्णा परदेशात पळून गेल्याची माहिती समोर आली होती. अशातच आता या प्रकरणावर स्वत: रेवण्णाने प्रतिक्रिया दिली आहे. हे राकीय षडयंत्र असल्याचं रेवण्णाने म्हटले आहे.
प्रज्वल रेवण्णाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, मी डिप्रेशनमध्ये गेलो आहे. माझ्याविरोधात राजकीय षडयंत्र रचले असून माझ्या विरोधात काही शक्ती कार्यरत आहेत. कारण राजकीयदृष्ट्या मी पुढे जात आहे. तसेच मी 31 मे रोजी सकाळी 10 वाजता एसआयटीसमोर उपस्थित राहून सहकार्य करणार आहे.
माझ्यावर खोटे खटले लावले आहेत. पण, माझा न्यायव्यवस्थेवर आणि कायद्यावर विश्वास आहे. तसेच मी परदेशातील माझ्या ठावठिकाणाबाबत योग्य ती माहिती न दिल्यामुळे माझे कुटुंबीय, माझे कुमारअण्णा आणि पक्ष कार्यकर्त्यांची मी माफी मागू इच्छितो, असंही प्रज्वल रेवण्णा म्हणाले.