राज्यातील वातावरणात सतत बदल पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी कडक
उन्हाळा तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळताना दिसत आहे. विदर्भात देखील विक्रमी
तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भाचा पारा ४५ ते ४६ सेल्सियस पर्यंत पोहचले आहे. पुढील आठवडा
विदर्भाचा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान
काल संध्याकाळी विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले आहे. अवकाळी पावसामुळे
विदर्भातील काही जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे.
अकोला,वाशीम, बुलढाणा
आणि यवतमाळ जिल्ह्यात काल संध्याकाळी जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह पाऊस
आल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळल्याने शेतकरी
राजाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला माल पावसात
भिजल्यामुळे बळीराजाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाले पडल्याने
वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली आहे.