लोकसभा निवडणुकीचे ६ टप्पे पूर्ण झाले आहेत. आता केवळ ७ वा म्हणजे केवळ एकच टप्पा पूर्ण होयचा बाकी राहिला आहे. ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधींबाबत एक विधान केले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी ४० पेक्षा जास्त जागा जिंकणार नाहीत असे वक्तव्य शहा यांनी केले आहे. तर इंडिया आघाडीतील समाजवादी पक्ष ४ जागाच मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
अमित शहा म्हणाले, ”४ जूनच्या निकालाबाबत मी आताच सांगू शकतो. राहुल गांधी तुमचा पक्ष ४० जागा पण नाही जिंकू शकणार. तसेच कितीही सहानुभतीने बोललात तरी अखिलेश येडं तुमचा पक्ष ४ पेक्षा जास्त जागा नाही जिंकू शकत.” नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान राहतील असा निसच्या देशातील जनतेने केला आहे. त्यानंतर पण ते अनेक वेळा पंतप्रधान होतील. अमित शहा उत्तर प्रदेशच्या कुशीनगर येथून विजय दुबे यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
४ जून रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर राहुल गांधी एक पत्रकार परिषद करतील, आणि त्यांच्या पराभवाला ईव्हीएम मशीनला जबाबदार धरतील असा टोला शहा यांनी लगावला आहे. तसेच ६ व्या एनडीएने बहुमताचा आकडा पार केला आहे असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला आहे.