भारतीय जनता पक्षाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वा. सावरकर यांना एका व्हिडिओच्या माध्यमातून नमन केले आहे आणि ट्विटमध्ये लिहिले आहे की,
“मातृभूमीच्या सेवेत आपले जीवन समर्पित करणारे महान स्वातंत्र्यसेनानी वीर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन”.
https://x.com/narendramodi/status/1795294593103049084
तर भाजप नेते आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी आपल्या ट्विटमध्ये स्वा. सावरकरांना आदरांजली वाहत म्हंटले आहे की,
सावरकर म्हणजे त्याग
सावरकर म्हणजे तपश्चर्या
सावरकर म्हणजे तत्व
सावरकर म्हणजे निश्चित तर्क
सावरकर म्हणजे तारुण्य
सावरकर म्हणजे बाण
सावरकर म्हणजे तलवार.
वीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त भारतमातेच्या आवडत्या सुपुत्रांपैकी एकाचे मी स्मरण करत त्यांना आदरांजली अर्पित करत आहे.राष्ट्राप्रती त्यांचा निस्वार्थ भाव आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहील.
तर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते अमित शाह यांनी स्वा. सावरकरांचा व्हिडिओ शेअर करत आपल्या ट्विटमधून त्यांना प्रणाम केला आहे. ते असे म्हणाले आहेत की,
“वीर सावरकरजींनी आपल्या ज्वलंत विचारांनी कोट्यवधी तरुणांमध्ये देशभक्तीची ज्योत प्रज्वलित केली आणि एक राष्ट्र, एक संस्कृती ही भावना बळकट केली. त्यांनी राष्ट्रवादाचा मंत्र आत्मसात केला आणि तुष्टीकरणाच्या धोरणांना कट्टर विरोध केला.
इंग्रजांनी केलेल्या अगणित अत्याचारांनीही त्यांचा मातृभूमीबद्दलचा निर्धार डळमळीत होऊ शकला नाही. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण राष्ट्रासाठी समर्पित करणाऱ्या वीर सावरकरांनी अस्पृश्यतेसारख्या दुष्कृत्यांविरुद्ध जनजागृती मोहीम सुरू केली.
खरे देशभक्त आणि स्वातंत्र्याचे महान द्रष्टे वीर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन”.