बडगई परिसरातील ८.८६ एकर जमिनीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि प्रमुख आरोपी हेमंत सोरेनच्या जामीन अर्जावर आज झारखंड उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती रंगन मुखोपाध्याय यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने ईडीच्या वकिलांना १० जूनपूर्वी प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले आहे . आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 जून रोजी होणार आहे.
सोरेन यांनी याचिकेमध्ये असे म्हंटले आहे की, “ते कोणत्याही चुकीच्या कामात सहभागी नव्हते आणि कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित कोणत्याही कागदपत्रांमध्ये त्यांचे नाव दिसत नाही”. त्यांनी असा युक्तिवाद केला की ईडी कोणत्याही आधारभूत कागदपत्रांशिवाय व्यक्तींच्या विधानांवर विश्वास ठेवला आहे.
31 जानेवारी रोजी ईडीच्या पथकाने हेमंत सोरेन यांना बडगई, रांची येथील भूखंडाची बेकायदेशीर खरेदी-विक्री प्रकरणात अटक केली होती. यापूर्वी हेमंत सोरेन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.हेमंत सोरेन यांच्याविरोधात ईडीने पीएमएलए कोर्टात यापूर्वीच आरोपपत्र दाखल केले आहे.
हेमंत सोरेन यांना 31 जानेवारी 2024 रोजी दीर्घ चौकशीनंतर ईडीने अटक केली होती. मात्र, सोरेन आपल्या अटकेला चुकीचे म्हणत ईडीचे आरोप सतत फेटाळत आहेत. दारू घोटाळा प्रकरणी तुरुंगात असलेल्या अरविंद केजरीवाल यांना निवडणूक प्रचारासाठी अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे हेमंत सोरेन यांनीही याच आधारावर जामीन मागितला मात्र त्यांना दिलासा मिळाला नाही.