सध्या राज्यातील आणि देशातील वातावरण सतत बदलताना पाहायला मिळत आहे.
काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस आणि कडाक्याचे ऊन पाहायला मिळत आहे. सर्वाना आता
मान्सूनची प्रतीक्षा लागली आहे. राज्यातील कमी होत चाललेला पाणीसाठा तसेच
मराठवाड्यातील भीषण पाणीटंचाई यामुळे मान्सून लवकरात लवकर महाराष्ट्रात यावा असे
सर्वाना वाटत आहे. दरम्यान लवकरच मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. हवामान
विभागाच्या अंदाजानुसार येत्या ५ दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो.
केरळमध्ये मान्सूनसाठी चांगले वातावरण
निर्माण झाले असल्याचे सांगितले जात आहे. मे महिन्याच्या अखेरीस मान्सून केरळमध्ये
दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ७ ते ८ दिवसांनी कोकणात मान्सून दाखल होऊ
शकतो. यंदा सरासरीच्या १०६ टक्के पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला
आहे. तसेच यंदा पाऊस समाधानकारक असेल असे देखील सांगण्यात आले आहे.