Mizoram Mine Collapse : मिझोराममध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. मिझोरामची दुर्घटना आयझॉलमध्ये मुसळधार पावसामुळे एक खाण कोसळली आहे. या दुर्घटनेत 10 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तसेच आणखी काही लोक यामध्ये अडकले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी 6 च्या सुमारास आयझॉल शहराच्या दक्षिणेकडील सीमेवर असलेल्या मेल्थम आणि हॅलिमेन दरम्यानच्या भागात घडली आहे. या घटनेत अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले असून अनेक मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
खाण कोसळल्याच्या या घटनेनंतर पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून बचावकार्य सुरू आहे. मात्र, मुसळधार पावासामुळे बचावकार्यावर परिणाम होताना दिसत आहे.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी भूस्खलन होताना दिसत आहे. त्यामुळे सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगण्यात आले आहे.