Baba Ram Rahim : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू गुरमित राम रहिम याला हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. 2002 मधील खून प्रकरणातून त्याची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. हा निकाल पंजाब आणि हरयाणा हायकोर्टानं दिला आहे. कोर्टानं हा निकाल दिला असला तरी राम रहिम हा अद्याप तुरूंगामध्येच राहणार आहे, कारण त्याला इतर खटल्यांमध्ये 20 वर्षांची शिक्षा झाली आहे.
2002 मध्ये डेराचा मॅनेजर रणजित सिंगची हत्या करण्यात आली होती. तर याप्रकरणी राम रहिमला सीबीआय कोर्टानं 2021 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सोबतच 31 लाख रूपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला होता. दरम्यान, आता हायकोर्टानं या प्रकरणात निर्दोष मुक्तता केली आहे.
हायकोर्टाने जरी राम रहिमची निर्दोष मुक्तता केली असली तरी तो सुनारिया तुरूंगातच असणार आहे. कारण इतर खूनाच्या खटल्यांमध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामध्ये दोन शिष्य महिलांवर बलात्कार आणि पत्रकार राम चंदर छत्रपती यांच्या खुनाचा समावेश आहे.