लोकसभा निवडणुकीतील मतदानाचे टप्पे संपत आले आहेत. ६ टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. ७ व्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार आहे. त्यानंतर ४ जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. दरम्यान त्याआधी शेवटच्या टप्प्यात सत्ताधारीर आणि विरोधक मोठ्या प्रमाणात प्रचार करत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी इंडिया आघाडीवर आरक्षणाच्या मुद्द्यावरून टीका केली आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांना विचारण्यात आले की, या निवडणुकीत आरक्षण हा इतका मोठा मुद्दा कसा बनला? तर पीएम मोदी म्हणाले, ”आम्ही लोकांना आरक्षणाबाबत सतर्क करत आहोत. ते म्हणाले की, विरोधी पक्ष अनुसूचित जमाती, ओबीसी आणि अतिमागास प्रवर्गातील बांधवांना अंधारात ठेवून त्यांची लूट करत आहे.” पंतप्रधान मोदींनी आर्टिकल ३७० बाबत देखील मुलाखतीमध्ये भाष्य केले आहे. ते म्हणाले, ”आर्टिकल ३७० हा केवळ ४-५ कुटुंबांचा अजेंडा होता, तो काश्मीरच्या लोकांचा अजेंडा नव्हता किंवा देशातील लोकांचा अजेंडा नव्हता.”
एनडीएने नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारच असा विश्वास व्यक्त केला आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ५ व्या आणि ६ व्या टप्प्यातच एनडीएने बहुमत पार केल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. देशाच्या विकासासाठी जनता मोदींनांच पुन्हा एकदा संधी देणार आहे असे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मात्र यंदा त्यांच्यासमोर इंडिया आघाडीने तागे आव्हान उभे केल्याने लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे.