सध्या जगभरात युक्रेन-रशिया, हमास विरुद्ध इस्त्राईल असे युद्ध सुरु आहे. तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली असल्याचे म्हटले जात आहे. मात्र इस्राईल आणि हमास मधील युद्धजन्य पारिस्थिती अधिकच तणावपूर्ण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात पुन्हा एकदा हमासने तेल अवीववर मिसाईल हल्ला केला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून इस्रायल आणि हमासमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर हमासने पुन्हा एकदा तेल अवीववर मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला असून, त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने देखील हल्ला केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल चार महिन्यांनंतर हमासने रविवारी इस्रायलवर रॉकेट हल्ला केला. गाझामधील रफाह येथून हमासने केलेल्या हल्ल्यामुळे सुरक्षित स्थळी जाण्यासाठी तेल अवीवसह इस्रायलच्या अनेक शहरांमध्ये सायरन वाजवण्यात आले. इस्रायलवरील हल्ल्यात हमासने लांब पल्ल्याच्या रॉकेटचा वापर केला होता. या हल्ल्यामुळे इस्रायलमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा मोठी हानी झाल्याची सध्या कोणतीही माहिती नाही. इस्रायली लष्कराने म्हटले आहे की, गाझा येथून आठ रॉकेट सोडण्यात आले होते, त्यापैकी बहुतेक हवाई संरक्षण यंत्रणेने आकाशात नष्ट केले.
हमासची सशस्त्र शाखा, अल-कासम ब्रिगेड्सने सांगितले की त्यांनी रविवारी तेल अवीववर “मोठा क्षेपणास्त्र” हल्ला केला. इस्त्रायली सैन्याने शहरात सायरन वाजवून संभाव्य रॉकेटचा इशारा दिल्याचे सांगितले जात आहे. इस्रायली आपत्कालीन वैद्यकीय सेवांनी सांगितले की त्यांना कोणत्याही जीवितहानीचे कोणतेही वृत्त मिळाले नाही.