स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चित्रपटाची खूप चर्चा झाली. हा चित्रपट रणदीप हुड्डा दिग्दर्शित केला होता. रणदीपने स्वातंत्र्यसैनिक सावरकरांची कथा मोठ्या पडद्यावर मांडली. या चित्रपटाचे आणि रणदीपच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. सावरकरांच्या भूमिकेसाठी रणदीपची मेहनत दिसून आली. सावरकरांच्या १४१ व्या जयंतीनिमित्त रणदीपने सेल्युलर जेलला भेट दिली आहे. पत्नी लिन लैशरामही त्याच्याबरोबर दिसून आली.
रणदीप हुड्डा म्हणाला, “वीर सावरकरांची कथा वाचताना आणि ती पडद्यावर आणताना मी कथेत पूर्णपणे गुंतून गेलो. वीर सावरकरांचे व्यक्तिमत्व जाणणारे लोक माझे कौतुक करतात तेव्हा खूप छान वाटते. त्याची कथा मी मोठ्या पडद्यावर अतिशय चांगल्या आणि ताकदीने आणायचा प्रयत्न केला आहे. आज आपण इथे त्या सेल्युलर जेलमध्ये आहोत जिथे स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिक्षा झाली होती. 50 वर्षांची जन्मठेपेची शिक्षा होती ही,… सर्व शक्तिशाली क्रांतिकारकांना ब्रिटीशांनी देशापासून दूर एकांतात ठेवले होते. ही ती जागा आहे…”
रणदीपचा वीर सावरकर पुरस्काराने गौरव
स्वातंत्र्यसैनिक सावरकर यांच्या १४१ व्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यसैनिक सावरकर पुरस्कारांचे वितरण नुकतेच मुंबईत करण्यात आले. अभिनेता रणदीप हुड्डा याला हा पुरस्कार मिळाला. अलीकडच्या चित्रपटात रणदीप हुड्डा यांनी साकारलेली सावरकरांची व्यक्तिरेखा खूप गाजली. पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना रणदीपने स्वातंत्र्यसैनिक सावरकरांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
पडद्यावर सावरकरांची भूमिका साकारण्यासाठी रणदीप हुड्डा ह्याने खूप मेहनत घेतली. त्याच्यात अप्रतिम साजेसा बदलही दिसून आला. वीर सावरकरांच्या भूमिकेत येण्यासाठी त्याने सुमारे ३२ किलो वजन कमी केले. या चित्रपटात मुख्य भूमिकेसह,अभिनेत्याने त्याचे दिग्दर्शनही केले आहे.
.