Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसेच त्यांनी निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचा पराभव निश्चित असल्याचे सांगितले. सोबतच 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसच्या पराभवाचे खापर राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियंका गांधी वाड्रा यांच्यावर नसून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर पडेल, असा दावाही अमित शाह यांनी केला आहे.
कुशीनगर येथे भाजप उमेदवाराच्या समर्थनार्थ आयोजित निवडणूक रॅलीत अमित शाह यांनी दावा केला की, या लोकसभा निवडणुकीनंतरही नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील आणि काँग्रेसचे लोक इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनला (EVM) दोष देतील.
4 जूनला मोदीजींचा आणि भाजपचा विजय निश्चित आहे. तसेच तुम्ही बघाच 4 तारखेला दुपारी राहुलबाबांचे लोक पत्रकार परिषद घेणार की ईव्हीएममुळे आमचा पराभव झाला. सोबतच या पराभवाचे खापर भावा-बहिणीवर (राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वढेरा) येणार नाही तर हा ठपका खरगे साहेबांवर पडणार असून त्यांची नोकरी जाणार आहे, असा दावाही अमित शाह यांनी केला आहे.