Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना दिलासा मिळालेला नाही. कारण न्यायालयाने केजरीवाल यांची याचिका फेटाळली आहे. केजरीवालांनी जामिनाची मुदत 7 दिवसांनी वाढवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांनी ही याचिका कोर्टाने फेटाळली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर अरविंद केजरीवाल यांना आता 2 जून रोजी आत्मसमर्पण करावं लागणार आहे. तसेच केजरीवाल यांना नियमित जामिनासाठी ट्रायल कोर्टात जाण्याची मुभा देण्यात आली आहे, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीने अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आता केजरीवालांना 2 जूनला आत्मसमर्पण करावं लागणार आहे.
दिल्ली मद्य घोट्याळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल हे तिहार तुरूंगात आहेत. कोर्टाने त्यांना जामीन दिला होता मात्र आता त्यांची 1 जूनला जामिनाची मुदत संपणार आहे. त्यामुळे केजरीवालांनी प्रकृतीच्या कारणास्तव 7 दिवसांची अधिकची वेळ कोर्टाकडे मागितली होती. मात्र, कोर्टाने त्यांची ही याचिका फेटाळली आहे.