Kapil Mishra On Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना दिलासा मिळालेला नाही. न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली आहे. केजरीवालांनी जामिनाची मुदत 7 दिवसांनी वाढवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांनी ही याचिका कोर्टाने फेटाळली आहे. तसेच केजरीवाल यांचा अंतरिम जामीन कालावधी संपत आला आहे. त्यामुळे 2 जूनला पुन्हा तुरुंगात जावे लागणार आहे.
मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मात्र, त्यांच्या याचिकेबाबत भाजपने त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पुन्हा तुरुंगात जाण्याची वेळ आली असताना केजरीवाल आजारपणाचे कारण देत आहेत, अशी टीका भाजपने केली आहे.
सीएम केजरीवाल यांच्या याचिकेवर भाजप नेते कपिल मिश्रा यांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, केजरीवाल यांनी तुरुंगात जाऊ नये यासाठी योजना तयार केली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून खोटी सहानुभूती मिळविण्याची तयारी सुरू आहे. पण सर्वोच्च न्यायालयाशी खेळण्याचा त्यांचा हा हेतू सफल होईल का? असे मिश्रा म्हणाले.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर अरविंद केजरीवाल यांना आता 2 जून रोजी आत्मसमर्पण करावं लागणार आहे. तसेच केजरीवाल यांना नियमित जामिनासाठी ट्रायल कोर्टात जाण्याची मुभा देण्यात आली आहे, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीने अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आता केजरीवालांना 2 जूनला आत्मसमर्पण करावं लागणार आहे.