सध्या राज्यासह देशातील वातावरणात मोठे बदल दिसून येत आहेत. काही
ठिकाणी कडक उन्हाळा तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळत आहे. मात्र राजधानी दिल्लीत
कडाक्याच्या उन्हाळ्याने कहर केला आहे. दुपारच्या वेळेस नागरिकांना बाहेर पडणे
अवघड झाले आहे. दिल्लीत उष्णतेच्या लाटेमुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे
लागत आहे. लोक आजारी पडत आहेत. रुग्णालयांमध्ये रांगा लागत आहेत. अशा परिस्थितीत
दिल्लीत काम करणाऱ्या मजुरांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. दिल्लीच्या नायब
राज्यपालांनी कामगारांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
भीषण उष्णतेच्या पार्श्वभूमीवर
दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी कामगारांना दुपारी १२ ते ३
वाजेपर्यंत सुट्टी देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांच्या पगारात कोणतीही कपात
होणार नाही. या आदेशासह, एलजीने दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल
किंवा त्यांच्या मंत्र्यांवर “उन्हाळी उष्णता कृती योजना” बाबत आतापर्यंत कोणतीही
कारवाई न केल्याबद्दल टीका केली आहे.