मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत
यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या वकिलामार्फत संजय
राऊत यांना मानहानीचे नोटीस पाठविण्यात आली आहे. नोटिसीतून तीन दिवसांत माफी मग
अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशाराच देण्यात आला आहे. सामना दैनिकातून संजय
राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले होते. त्याच प्रकरणात आता
ही नोटीस राऊतांना पाठविण्यात आली आहे दरम्यान ही नोटीस म्हणजे फनी डॉक्युमेंट
असल्याचे राऊत म्हणाले आहेत.
ठाकरे गटाचे खासदार आणि दैनिक सामनाचे
वृत्तसंपादक संजय राऊत यांनी सामन्यातून मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली.
यामध्ये महायुतीमध्ये सर्वकाही ठीक नसल्याचे त्यात लिहिण्यात आले. राष्ट्रवादी
काँग्रेसचा पक्षाचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी एकनाथ शिंदे यांनी काम
केले असल्याचा आरोप करण्यात आला होता. यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ
उडाली होती. त्यानंतर फडणवीसांनी देखील यावर तीव्र प्रतिक्रिया दिली होती. यानंतर
आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत राऊतांना कायदेशीर नोटीस पाठविण्यात
आली आहे.