Pune Porsche Accident : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या अपघात प्रकरणात दररोज मोठे खुलासे होताना दिसत आहेत. यामध्ये ससून रूग्णलयातील तीन जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी ससूनमधील 2 डॉक्टरांना अटक करण्यात आली असून त्यांचे निलंबन देखील करण्यात आले आहे. तर आता या डॉक्टरांच्या चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
या अपघातातील अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवालचे ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी ससून रूग्णालयातील दोन डॉक्टरांना आणि एका सफाई कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. तर त्या तिघांच्या चौकशीवेळी धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये डॉ. हळनोर यांनी आरोपीचं ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी मोठा खुलासा केला आहे.
आपल्यावर रूग्णालयातील विभाग प्रमुख असलेल्या अजय तावरे यांनी आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी दबाव टाकला होता. तसेच अल्पवयीने आरोपीचे वडील विशाल अग्रवाल आणि डॉ. तावरे यांचं एकमेकांसोबत बोलणं झालं होतं, अशी माहिती डॉ. हळनोर यांनी दिली.
आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलणं हे माझ्या मनाला पटत नव्हतं. पण हे कृत्य करण्यासाठी माझ्या वरिष्ठांनी माझ्यावर दबाव टाकला होता. तसेच माझ्याकडून मोठी चूक झाल्याचंही मला वाटत होतं, असा खुलासाहीडॉ. हळनोर यांनी केला आहे.