भारताच्या आर. प्रज्ञानंद याने बुधवारी नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनचा पराभव करून २०२४ च्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीनंतर एकल आघाडी घेतली. १८ वर्षीय भारतीय ग्रँडमास्टरने कार्लसनला त्याच्या घरच्या मैदानावरपराभूत केले आणि नॉर्वेविरुद्ध क्लासिकल फॉरमॅटमध्ये पहिला विजय नोंदवला. या विजयासह, प्रज्ञानंदने स्पर्धेत 5.5/9 गुणांसह एकल आघाडी घेतली. कार्लसनची पाचव्या स्थानावर घसरण झालीआहे.
तर दुसरीकडे, फॅबियानो कारुआनाने क्लासिकलमध्ये डिंग लिरेनचा पराभव केला, तो तीन गुण मिळवणारा दुसरा खेळाडू ठरला, तर हिकारू नाकामुराने आर्मागेडॉनमध्ये अलिरेझा फिरोझाचा पराभव केला आहे. सर्वप्रथम, हम्पी कोनेरूने लेई टिंगजीचा पराभव केला. दिवसाच्या उत्तरार्धात, पिया क्रॅमलिंगने जू वेनजुनला १.५ गुण देऊन सामना अनिर्णित केला. त्यानंतर वैशाली रमेशबाबूने अण्णा मुझीचुकला बरोबरीत रोखले आणि आपली एक गुणांची आघाडी कायम ठेवली.