लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार
आहे. त्यासाठी सुरु असलेला प्रचार आज संपणार आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित
शहा यांनी उत्तर परदेशमधील बालिया जिल्ह्यात एका प्रचारसभेला संबोधित केले. यावेळी
त्यांनी काँग्रेस, सपा आणि बसपा यांच्यावर टीका केली आहे. यावेळी शहा यांनी एनडीएचे
उमेदवार नीरज शेखर यांना विजयी करण्यासाठी जनतेला आवाहन केले.
सभेला संबोधित करताना अमित शहा म्हणाले, ”काँग्रेस,
सपा
आणि बसपाच्या राजवटीत देशात आणि राज्यात दहशतवादी हल्ले व्हायचे, पण
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून दहशतवाद आणि नक्षलवाद संपला आहे. गुजराती
हिशेबात चांगले असतात. एकाच वेळी अनेक गोष्टी करा. एकाच वेळी तीन कार्ये असल्यास,
ती
पूर्ण करणे आवश्यक आहे. नीरज शेखरला मतदान केल्याने एकाच वेळी तीन गोष्टी होतील.
नीरज खासदार होणार, मोदी पंतप्रधान होणार आणि स्व. चंद्रशेखर यांना श्रद्धांजली वाहता
येईल.”
शहा पुढे बोलताना म्हणाले, ”मी
नीरज शेखर यांना भाजपमध्ये आणले आहे. ते आयुष्यभर भाजपचे सैनिक राहतील. नीरज यांना
मिळालेले प्रत्येक मत मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी उपयुक्त ठरेल. जेव्हा
बलियाच्या लोकांनी वीरेंद्र सिंह मस्त यांना मतदान केले तेव्हा काश्मीरमधून कलम 370
हटवण्यात
आले. ते म्हणाले की, काँग्रेसचे लोक पीओकेबाबत लोकांना घाबरवतात. राहुल गांधी आम्ही
भाजपवाले अणुबॉम्बला घाबरत नाही. पीओके आमचे आहे आणि आम्ही ते घेऊच”