सध्या देशातील अनेक भागात पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.
भीषण टंचाई जाणवत आहे. देशाची राजधानी दिल्लीत देखील पाण्याची मोठी टंचाई असल्याचे
पाहायला मिळत आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी दिल्ली सरकारने आज दिल्ली
सचिवालयात तातडीची बैठक बोलावली आहे. आजच्या या तातडीच्या बैठकीचे नेतृत्व हे
जलसंपदा मंत्री आतीशी आणि दिल्लीचे आरोग्यमंत्री सौरभ भारद्वाज करणार आहेत. आजच्या
बैठकीत मुख्य सचिवांसह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतील.
दिल्ली शहरातील विविध भागांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली
आहे. याबाबतचा अहवाल सरकारला प्राप्त झाला आहे. पाणी समस्येमुळे नागरिकांना
तासंतास टँकरमधून पाणी भरण्यासाठी रांगेत थांबावे लागत आहे. ”दिल्लीला
पाण्याचा योग्य वाटा मिळाला पाहिजे. हरियाणा सरकारच्या मनमानी कारवाईमुळे
राज्यातील अनेक भागात समस्या निर्माण झाल्या आहेत, असे दिल्लीच्या
जलसंपदा मंत्री आतीशी यांनी सांगितले.
याबाबत पुढे बोलताना मंत्री आतीशी
म्हणाल्या, “आम्ही हरियाणा सरकारला पत्र लिहिले आहे. आज आम्ही केंद्र सरकारकडे
जाऊन जेणेकरून दिल्लीला त्यांच्या हक्काचे पाणी मिळाले पाहिजे. पाण्याच्या
टंचाईमुळे दिल्लीच्या विविध भागांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. मनमानी कारवाया जर
कच्चे पाणी नसेल तर पाण्याचे उत्पादन कसे होईल?”