दिल्ली दारू घोटाळ्याूतील सीबीआयशी संबंधित प्रकरणात दिल्लीच्या राऊस
एव्हेन्यू न्यायालयाने माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन
कोठडीत ६ जुलैपर्यंत वाढ केली आहे. आज सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडी संपत होती,
त्यानंतर
त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले.
१५ मे रोजी न्यायालयाने सीबीआय प्रकरणात सिसोदिया यांच्या न्यायालयीन
कोठडीत आजपर्यंत वाढ केली होती. ईडीने ९ मार्च २०२३ रोजी या प्रकरणी चौकशीनंतर
मनीष सिसोदिया यांना तिहार तुरुंगातून अटक केली होती. सिसोदिया यांना यापूर्वी २६
फेब्रुवारी २०२३ रोजी सीबीआयने अटक केली होती. या प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद
केजरीवाल अंतरिम जामिनावर आहेत. १० मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना २
जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला होता. केजरीवाल यांनी राऊस ॲव्हेन्यू कोर्टात
नियमित जामीन याचिका दाखल केली आहे. मात्र कोर्टाने ही याचिका फेटाळून लावत २ जून
रोजी सरेंडर करण्याचे आदेश दिले आहेत.
२१ मे रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने
सीबीआय आणि ईडी प्रकरणात दाखल केलेली सिसोदिया यांची दुसरी जामीन याचिका फेटाळली
होती. सिसोदिया यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले
होते. सिसोदिया यांची याचिका केवळ खटल्याच्या सुनावणीला उशीर झाल्याच्या कारणावरून
दाखल करण्यात आली आहे. हायकोर्टाने म्हटले होते की, खटला चालवण्यास
विलंब होत नाही, परंतु आरोपींनी अनेक याचिका दाखल केल्या होत्या त्यामुळे विलंब होत
आहे.