Arvind Kejriwal : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे 2 जूनपर्यंत जामिनावर बाहेर आहेत. तर आता लवकरच त्यांना पुन्हा एकदा जेलमध्ये जावं लागणार आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी पुढे काही दिवस जामीन मिळावा यासाठी राऊज अव्हेन्यू कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने त्यांची याचिका फेटाळल्यानंतर त्यांनी राऊज अव्हेन्यू कोर्टात धाव घेतली.
अरविंद केजरीवाल यांनी कोर्टात रेग्युलर आणि अंतरिम अशा दोन्ही जामीन याचिका दाखल केल्या आहेत. तर यावर आज दुपारी दोन वाजता सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान ईडीने केजरीवालांच्या याचिकेला विरोधत करत त्यांनी भर कोर्टात सवाल केला.
जर अरविंद केजरीवालांची प्रकृती खराब आहे तर ते इतक्या जोरजोरात निवडणुकीचा प्रचार का करत आहेत? असा सवाल ईडीने भर कोर्टात उपस्थित केला. यावेळी ईडीच्या वतीने एएसजी एसव्ही राजू यांनी केजरीवालांच्या याचिकेवर उत्तर दिलं. ते म्हणाले, मला आत्ताच एक कॉपी मिळाली असून मला उत्तर दाखल करण्यासाठी वेळ पाहिजे. तसेच केजरीवाल पंजाबमध्ये निवडणुकीचा प्रचार करत आहेत, तर मग आता त्यांना त्यांची प्रकृती प्रचार करण्यापासून रोखत नाही हे विशेष. त्यामुळे त्यांच्या या वागणुकीनुसार त्यांना जामीन मिळाला नाही पाहीजे, असा युक्तीवाद एएसजी एसव्ही राजू यांनी केला आहे.