उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज भाजप उमेदवार आणि अभिनेत्री कंगना रणौत हिच्यासाठी कुल्लू येथे जाहीर पाठिंबा मागितला आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे . ते म्हणाले की, जी काँग्रेस केंद्रात सरकार स्थापनेची भाषा करत आहे, ती प्रत्यक्षात देशात चारशे जागांवर निवडणूकही लढवत नाही.
मुख्यमंत्री योगी कुल्लू येथील रथ मैदानावर निवडणूक सभेला संबोधित करत होते. योगी म्हणाले की, हिमाचलची मुलगी कंगनामध्येही आपल्या विरोधकांशी लढण्याची महाराणी लक्ष्मीबाईंची वीरता आहे. कंगनाने काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंना रस्त्यावर आणून पाणी पिण्यास भाग पाडले होते.
तसेच योगी म्हणाले की, आज संपूर्ण देशात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत एकच नारा गुंजत आहे आणि तो म्हणजे पुन्हा एकदा मोदी सरकार, चारसौ पार मोदी सरकार
योगी म्हणाले की, आज ह्यावेळेची संपूर्ण निवडणूक राम भक्त आणि राम देशद्रोही यांच्यात विभागली गेली आहे. जनता जनार्दन आज एकच सांगत आहे, ज्यांनी राम आणला त्यांनाच आम्ही आणू. ज्याच्यासाठी भारताचे हित सर्वोपरि आहे तोच रामभक्त. नक्षलवाद आणि दहशतवादाचे समर्थन करणारा राम देशद्रोही आहे. तसेच देशाचा अनादर करणारे, गरिबांचे हित लुटणारे ते रामद्रोही आहेत.असे म्हणत योगीनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे.
मुख्यमंत्री योगी म्हणाले की, आजचा नवा भारत कोणाला छेडत नाही, कोणी छेडले तर सोडत नाही. आज देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात छोटा फटाकाही फोडला जातो, तेव्हा पाकिस्तान आपणहूनच स्पष्टीकरण देते. .
एका झटक्यात गरिबी हटवू असे काँग्रेस म्हणते, ते कसे करणार असे विचारले असता, सर्वेक्षण करून घेणार असल्याचे ते सांगतात. मात्र तुमच्या आजोबांच्या मालमत्तेचे सर्वेक्षण केल्यानंतर निम्मी मालमत्ता बांगलादेशी घुसखोरांना दिली जाईल. मग तुमची संपत्ती घुसखोरांना देणाऱ्या या पक्षाला सत्तेत आणायचे आहे का हे जनतेने ठरवायचे आहे. असे योगी जनतेला उद्देशून म्हणाले आहेत.