लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आज नरेंद्र मोदी हे पंजाबच्या
दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली आहे. तसेच दलित,
आदिवासी
समाजाचे आरक्षण काढून घेण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा आरोप मोदींनी केला आहे
इंडिया आघाडीवाले संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करत आहेत असा
आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पंजबाच्या होशिरापूर येथून बोलत
होते.
पंजबामधील सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,
”दलित,
मागासवर्गीय
आणि आदिवासींचे आरक्षण कोणालाही हिसकावून देणार नाही हा मोदीचा संकल्प आहे. माझ्या
या प्रयत्नामुळे काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे लोक बावचळले आहे. एससी-एसटी, ओबीसींचे
आरक्षण हिसकावून घेण्याचा त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. ते संविधानाच्या भावनेचा आणि
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या आत्म्याचा अपमान करत आहेत. त्यांना दलित आणि
मागासवर्गीयांचे आरक्षण काढून फक्त मुस्लिमांना द्यायचे आहे. मोदींनी त्यांच्या
कारस्थानाचा पर्दाफाश केला आहे आणि त्यामुळेच ते संतापले आहेत आणि मोदींना शिव्या
देत आहेत.”
पुढे बोलताना मोदी म्हणाले, ”काँग्रेस
आणि इंडिया आघाडीच्या स्वार्थी आणि व्होटबँकेच्या राजकारणाने देशाचे खूप नुकसान
केले आहे. त्यांच्या व्होटबँकेवरील प्रेमामुळे, फाळणीच्या वेळी
त्यांना करतारपूर साहिबवर आपला हक्क सांगता आला नाही. हे तेच लोक आहेत जे
त्यांच्या मतपेढीसाठी राम मंदिराला, CAA ला
विरोध करत आहेत.