स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या
विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यसेवेची परीक्षा आधी ६ जून
रोजी होणार होती. मात्र आता त्यामध्ये एक बदल करण्यात आला आहे. ६ जून रोजी होणारी
परीक्षा आता २१ जुलै रोजी होणार आहे. आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांच्या
कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना ओबीसी प्रवर्गातून अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
देण्यात आली आहे. याबद्दल माहिती आयोगाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे. २१
जुलै रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून वर्ग १ आणि वर्ग २ प्रवर्गातील एकूण ५२४
पदांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे.