समाजवादी पक्षाचे (एसपी) नेते आझम खान यांना आणखी एका प्रकरणात
शिक्षा सुनावण्यात आली आहे. रामपूरच्या डुंगरपूर प्रकरणात एमपी एमएलए कोर्टाने आझम
खान यांना १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. डुंगरपूर प्रकरणात अबरार नावाच्या
व्यक्तीने ६ डिसेंबर २०१९ रोजी आझम खान, सेवानिवृत्त सीओ आले हसन खान आणि बरकत
अली कॉन्ट्रॅक्टर यांच्यासह 3 जणांविरुद्ध पोलीस स्टेशन गंजमध्ये
गुन्हा दाखल केला होता.
फिर्यादी अबरार यांच्या म्हणण्यानुसार,
आझम
खान, सेवानिवृत्त सीओ आले हसन खान आणि बरकत अली कॉन्ट्रॅक्टर यांनी
त्यांना मारहाण केली. घराची तोडफोड करून जीवे मारण्याची धमकी दिली. यासोबतच
त्यांचे घरही फोडण्यात आले. ही घटना ६ डिसेंबर २०१६ रोजी घडली असून २०१९ मध्ये गंज
पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. निवृत्त सीओ आले हसन खान यांची फाईल
या प्रकरणातून वेगळी करण्यात आली आहे, कारण आले हसन यांच्यावर उच्च
न्यायालयाची स्थगिती आहे. आझम खान यांची पत्नी तंजीन फातिमा यांची काल म्हणजेच २९
मे रोजी जामीन मिळाल्यानंतर तुरुंगातून सुटका झाली. आज कोर्टाने आझम खान यांना १०
वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे आता आझम खान यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.