लोकसभा निवडणुकीसाठी ७ व्या म्हणजेच अखेरच्या टप्प्यातील मतदान १ जून
रोजी पार पडणार आहे. त्यानंतर ४ जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.
यंदा निवडणूक आयोगाने एकूण ७ टप्प्यात मतदान प्रक्रिया राबविली आहे. दरम्यान १जून
म्हणजे ७ व्या टप्प्याच्या मतदानासाठी होणारा प्रचार आज संपणार आहे. म्हणजेच
अखेरच्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा अखेर आज थंडावल्या आहेत.
१ जून रोजी ८ राज्ये आणि एका
केंद्रशासित प्रदेशातील ५७ जागांवर मतदान होणार आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र
मोदी, कंगना रानौत आणि अन्य महत्वाच्या उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये
बंद होणार आहे. अखेरच्या टप्प्यात पंजाबमधील १३, पश्चिम बंगाल ९,
बिहारमधील
८, ओडिशामधील ६, हिमाचल प्रदेशमधील ४, झारखंडमध्ये
३ आणि चंदीगडमधील एका जागेवर मतदान होणार आहे.