177 प्रवासी आणि एक अर्भक घेऊन श्रीनगरला जाणाऱ्या विस्तारा फ्लाइटला आज बॉम्बची धमकी एका फोनद्वारे देण्यात आली होती. ज्या नंतर एअरलाइन आणि सुरक्षा दलांनी त्वरित कारवाई केली. दिल्लीहून निघालेले फ्लाइट क्रमांक-UK-611 सकाळी 12:10 वाजता श्रीनगर विमानतळावर सुरक्षितपणे उतरले.
या संदर्भात, विस्ताराच्या प्रवक्त्याने या घटनेची पुष्टी करताना सांगितले की, स्थापित प्रोटोकॉलनुसार संबंधित अधिकाऱ्यांना ताबडतोब कळविण्यात आले असून ही धमकी खोटी असल्याचे निष्पन्न झाले.
“प्रोटोकॉलचे पालन करून, आम्ही ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांना कळवले आणि श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरल्यानंतर विमान अलगीकरण कक्षात नेण्यात आले, जिथे सर्व ग्राहकांना उतरवण्यात आले. अनिवार्य सुरक्षा तपासणी पूर्ण करण्यासाठी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य केले. सर्व आवश्यक तपासण्या केल्या गेल्या आहेत आमच्यासाठी आमच्या ग्राहकांची, क्रू आणि विमानाची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे,” असे प्रवक्त्याने सांगितले आहे. .
दिल्लीहून येणाऱ्या विस्तारा फ्लाइट UK611 ला लक्ष्य करणारा बॉम्बचा धमकीवजा कॉल आल्यानंतर , श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानतळ प्राधिकरणाने तत्काळ कारवाई करण्यास सांगितले. विमानतळाच्या एका अधिकाऱ्याने फोनवर पुष्टी केली की ही धमकी खोटी होती आणि सामान्य कामकाज पुन्हा सुरू झाले आहे.