Shiv Pratap Shukla : लोकसभा निवडणूक 2024 चा आज शेवटचा टप्पा आहे. आजच्या सातव्या टप्प्यात पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, चंदीगड, हिमाचल प्रदेश, ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये मतदान होत आहे. त्यामुळे आज 904 उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद होणार आहे.
आजच्या या शेवटच्या टप्प्यात सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील लोकसभेच्या एकूण 57 जागांसाठी मतदान होत आहे. तर आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेसह अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचत आहेत.
यादरम्यान आता हिमाचल प्रदेशचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “मी आज माझे मत दिले आहे. सर्व मतदारांनी आज मतदान करावे आणि विकासाची कामे पुढे नेणाऱ्या सरकारला मतदान करावे”, असे आवादन शिव प्रताप शुक्ला यांनी केले आहे.