Rabari Devi : आज लोकसभा निवडणूक 2024 चा आज शेवटचा टप्पा आहे. आजच्या सातव्या टप्प्यात पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, चंदीगड, हिमाचल प्रदेश, ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये मतदान होत आहे. त्यामुळे आज 904 उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद होणार आहे.
आजच्या या शेवटच्या टप्प्यात सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील लोकसभेच्या एकूण 57 जागांसाठी मतदान होत आहे. तर आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेसह अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचत आहेत. यामध्ये आता माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे,
राबडी देवी यांनी लालू प्रसाद यादव यांच्यासमवेत मतदानाचा हक्क बजावला. तसेच मतदान केल्यानंतर राबडी देवी म्हणाल्या की, आम्ही बिहारमधील सर्व 40 जागा जिंकू, असा विश्वास राबडी देवींनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, आजच्या सातव्या टप्प्यात पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, चंदीगड, हिमाचल प्रदेश, ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये मतदान होत आहे. त्यामुळे आज 904 उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद होणार आहे.